6. दिल्लीचे सुलतान | Iyatta Satavi Prashnottare

6. दिल्लीचे सुलतान

या पाठाची प्रश्नोत्तरे खाली दिलेली आहेत. Iyatta Satavi Prashnottare. ते PDF मध्ये DOWNLOAD करण्यासाठी खाली लिंकही दिलेली आहे.

I. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून पूर्ण करा .

1.पृथ्वीराज  चौहान याने तराईच्या युद्धात महमद घोरी चा पराभव केला .

2 .अल्लाउद्दीन खिलजीने दिल्लीत सिरी किल्ल्याची निर्मिती केली .

3 .इब्राहीम लोदीचा पराभव बाबर याने केला .

II. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा .

1. तराईच्या दुसऱ्या युद्धात महंमद घोरीने कोणाचा पराभव केला ?

उत्तर- तराईच्या दुसऱ्या युद्धात महंमद घोरीने पृथ्वीराज  चौहान चा पराभव केला

2. कुतुबमिनार कोणी निर्माण केला ?

उत्तर- कुतुबमिनार कुतुबुद्दीन ऐबक याने निर्माण केला.

3. दिल्ली सुलतानांच्या काळातील कारभार केलेली महिला कोण ?

उत्तर- सुल्ताना ही दिल्ली सुलतानांच्या काळातील कारभार केलेली महिला होय.

4. दक्षिण भारतावर आक्रमण केलेल्या अल्लाउद्दिन खिलजीचा सेनापती कोण ?

उत्तर- दक्षिण भारतावर आक्रमण केलेल्या अल्लाउद्दिन खिलजीचा सेनापती गुलाम मलिक कपूर होय.

5. महंमद बिन तुघलखाने राजधानी कोठून कोठे स्थलांतरित केली ?

उत्तर- महंमद बिन तुघलखाने राजधानी दिल्ली येथून भारताच्या मध्यभागी असलेल्या देवगिरी येथे स्थलांतरित केली.

6. मी देवाचा प्रतिनिधी असे कोणत्या राजाने म्हटले ?

उत्तर- बल्बन या राजाने मी देवाचा प्रतिनिधी असे म्हटले.

II. गटात चर्चा करून उत्तरे लिहा .

1. महंमद गझनीच्या स्वाऱ्यांचे परिणाम लिहा .

उत्तर- महंमद गझनी हा अफगाणिस्ताणातील गझनी नावाच्या छोट्याश्या राज्याचा सुलतान होता. त्याने भारतावर 17 वेळा स्वाऱ्या केल्यामुळे भारतातील अनेक ऐश्वर्य-संपन्न शहरे उध्वस्त झाली. धार्मिक स्थळे नाश झाली.

2. दिल्लीवर कोणकोणत्या घराण्यानी राज्य केले ?

उत्तर- दिल्लीचा कारभार गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद आणि लोदी या 5 वंशांच्या राजांनी चालविला.

3. कुतुबुद्दीन ऐबकाची कामगिरी लिहा .

उत्तर- कुतुबुद्दीन ऐबकाने शत्रूला जिंकून तुर्कांचे राज्य बळकट केले. आपण मिळविलेल्या विजयाची आठवण म्हणून दिल्ली येथील मेहरौली येथे कुतुबमिनार बांधण्यास सुरुवात केले.

4. अल्लाउद्दिन खिलजीची महत्त्वाकांक्षा काय होती ?

उत्तर- संपूर्ण भारत जिंकून आपल्या अधिपत्याखाली आणावे अशी अल्लाउद्दिन खिलजीची महत्त्वाकांक्षा होती.

5. महंमद बिन तुघलकाने केलेले प्रयोग कोणते ?

उत्तर- महंमद बिन तुघलकाने राजधानी दिल्लीतून देवगिरीला स्थलांतरित केली. आणि नंतर निर्णय रद्द केला. तसेच चांदीच्या नान्याऐवजी तांब्याची नाणी चलनात आणली. पण तो हि निर्णय बदलला.

6. दिल्लीच्या सुलतानानी वास्तुशिल्पकला व साहित्याला दिलेले योगदान कोणते ?

उत्तर- दिल्लीच्या सुलतानाच्या काळातील प्रमुख वास्तुशिल्प  कुतुबमिनार, अलाई दरवाजा, कव्वत-उल-इस्लाम मशीद आणि सिरी किल्ला ही होत.

         या काळात उर्दू भाषा प्रचलित झाली. अमीर खुस्त्रो आणि अमीर हसन हे त्या काळातील प्रसिद्ध पर्शियन कवी व संगीतकार होत.जयशी या उर्दू कवीने “पद्मावत” हे सुफी काव्य लिहिले. रामानंद, कबीर, राईदास, मीरा हे सर्व या काळातील संत होत.

IV.अगटातील घटकांचा ब गटातील घटकाशी जोड्या जुळवा .

   अ                                ब

जयशी                           अलाई दरवाजा

दौलताबाद                     सितार

अल्लाउद्दिन                 पदमावत

                 अमीर खुस्रो                    देवगिरी

उत्तर-             अ                               ब

जयशी                           पदमावत

दौलताबाद                     देवगिरी

अल्लाउद्दिन                 अलाई दरवाजा                  अमीर खुस्रो                    सितार

वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

पाठ 7. मोगल प्रश्नोत्तरे येथे मिळवा.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top