शाळा प्रारंभोत्सव आणि सेतूबंध मार्गदर्शक तत्त्वे 2026-27

शाळा प्रारंभोत्सव आणि सेतूबंध मार्गदर्शक तत्त्वे 2026-27 | शाळा गुरू

कर्नाटक: शाळा प्रारंभोत्सव, नावनोंदणी मोहीम आणि सेतूबंध (Bridge Course) मार्गदर्शक तत्त्वे 2026-27

शालेय शिक्षण विभाग आणि DSERT द्वारे अधिकृत नियमावली जारी

शालेय शिक्षण विभाग आणि DSERT कर्नाटक द्वारे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यावर्षी शिक्षकांवरील कामाचा ताण आणि कागदोपत्री कामाचा (Paperwork) बोजा कमी करण्यासाठी नियमांचे मोठ्या प्रमाणावर सरलीकरण करण्यात आले आहे. चला तर मग, जाणून घेऊया या परिपत्रकातील प्रमुख ठळक मुद्दे:

1. शाळा प्रारंभोत्सव आणि वेळापत्रक (Timeline)

  • 29.05.2026: सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शाळेत हजर राहून पूर्वतयारी करणे अनिवार्य आहे.
  • 01.06.2026 ते 30.06.2026: शाळा प्रारंभोत्सवासोबतच विद्यार्थी प्रवेश आणि नावनोंदणी मोहीम (दाखलाती आंदोलन) राबवली जाईल.
  • पहिली तासिका: 1 जून रोजी पहिल्या दोन तासिकांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करून, तिसऱ्या तासिकेपासून प्रत्यक्ष अध्यापन व सेतूबंध सुरू केला जाईल. पहिल्या दिवशी माध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना गोड जेवण (सीही ऊटा) दिले जाईल.

2. सेतूबंध कालावधी आणि वर्गनिहार नियोजन

इयत्ता / वर्ग उपक्रम / कालावधी मार्गदर्शक सूचना
इयत्ता 1 ली (कन्नड व उर्दू माध्यम) 30 दिवसांचा 'विद्याप्रवेश' कार्यक्रम नली-कली विद्यार्थ्यांसाठी खेळातून शिक्षण.
इयत्ता 2 री आणि 3 री समग्र शिक्षण कर्नाटक (SSK) नियोजन SSK च्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी.
इयत्ता 4 थी ते 10 वी 15 दिवसांचा सेतूबंध अभ्यासक्रम सर्व प्रमुख विषयांची उजळणी.
द्विभाषिक शाळा (इयत्ता 1 ते 5) 30 दिवसांचा Transtion Period स्वतंत्र परिपत्रक लवकरच प्रसिद्ध होईल.

3. नैदानिक/पूर्व चाचणीतील महत्त्वाचे बदल (Diagnostic Test)

यापूर्वी केवळ क्षमतेवर आधारित चाचणी असायची, मात्र या वर्षी प्रश्नपत्रिका FLN (मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान) आणि अपेक्षित अध्ययन निष्पत्ती (LOs) यावर आधारित असेल.

  • प्रश्नांची संख्या कमी: आधीच्या 20 प्रश्नांऐवजी आता केवळ 10 लेखी प्रश्नांची प्रश्नपत्रिका तयार करायची आहे.
    • 40% (पहिले 4 प्रश्न): FLN शी संबंधित असावेत.
    • 60% (उर्वरित 6 प्रश्न): मागील इयत्तेच्या अध्ययन निष्पत्तींवर (LOs) आधारित असावेत.
  • अधिकृत दस्तऐवजीकरणासाठी केवळ या 10 लेखी प्रश्नांचाच विचार केला जाईल. शिक्षकांना हवे असल्यास ते तोंडी प्रश्न विचारू शकतात.

4. विद्यार्थ्यांचे वर्गीकरण आणि श्रेणी पद्धती (Grading)

शाळा शैक्षणिक आराखड्यात (SAP) प्रगती नोंदवण्यासाठी श्रेणी पद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे:

  • 'A' ग्रेड: पूर्णपणे अचूक आणि योग्य उत्तर असेल तरच 'A' ग्रेड द्यावा.
  • 'B' ग्रेड: अपूर्ण, अर्धवट बरोबर किंवा उत्तर न दिलेल्या प्रश्नांसाठी 'B' ग्रेड द्यावा.

विद्यार्थ्यांचे वर्गीकरण दोन गटात होईल:

  • FLN उपचारात्मक विद्यार्थी: प्रश्न क्र. 1 ते 4 मध्ये 'B' ग्रेड मिळवणारे विद्यार्थी (FLN न साध्य केलेले).
  • अध्ययन कमतरता (Learning Gap) विद्यार्थी: प्रश्न क्र. 5 ते 10 मध्ये 'B' grading मिळवणारे विद्यार्थी.

5. उपचारात्मक अध्यापन आणि दस्तऐवजीकरण (Remedial Teaching)

  • 'B' ग्रेड मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या गरजेनुसार स्वतंत्र उपक्रम तयार करून 15 दिवस उपचारात्मक अध्यापन (Remedial Teaching) करावे लागेल.
  • चाचणीनंतर विद्यार्थ्यांच्या प्रगतीची नोंद सुधारित SAP नमुना 4A, 4B, 5A आणि 5B मध्ये करणे बंधनकारक आहे.
  • यासाठी DSERT सेतूबंध साहित्य, सराव पत्रिका, गृहपाठ आणि प्रश्नमंजुषा यांचा वापर करता येईल.

6. तांत्रिक आणि इतर महत्त्वाचे बदल

  • KAAMS ॲप अनिवार्य: सर्व सरकारी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना 'KAAMS' मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती नोंदवणे अनिवार्य आहे.
  • 'निरंतर' AI उपस्थिती: विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी AI-आधारित फेशिअल अटेंडन्स सिस्टम लागू केली आहे.
  • मिंचिना संचारा (अचानक भेटी): सुरुवातीच्या काळात शाळांची पूर्वतयारी, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पाहणी करण्यासाठी फ्लाइंग स्क्वॉडद्वारे अचानक भेटी दिल्या जातील.

7. उपस्थिती आणि वेळेचे कडक नियम (Attendance & Leave Rules)

⏱️ उशिरा यायच्या वेळेबाबत नियम (Late Arrival):

  • शाळा सुरू होण्याच्या वेळेपासून १० ते १५ मिनिटे सवलत असेल (उदा. शाळा ९:४५ ची असल्यास, १०:०० वाजेपर्यंत सूट).
  • ३ दिवस उशीर = १ सुट्टी कपात: महिन्यात ३ वेळा उशीर झाल्यास 1 किरकोळ रजा (CL) कपात केली जाईल. CL शिल्लक नसल्यास अर्जित रजा (EL) कपात होईल.
  • दीर्घकाळ गैरहजेरी: विनाकारण १ तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास मुख्याध्यापक तो अर्धा दिवस रजा (Half-Day) म्हणून नोंदवू शकतात. नोंद न केल्यास पूर्ण दिवस गैरहजर (Absent) मानले जाईल.
  • कारणे दाखवा नोटीस: सतत उशिरा येणाऱ्यांना थेट BEO किंवा DDPI स्तरावरून नोटीस येऊ शकते व त्याची नोंद सेवा पुस्तकात (Service Register) होऊ शकते.

🚪 वेळेपूर्वी जाणे (Early Check-out) नियम:

  • अर्धा दिवस रजा कपात: अधिकृत सुट्टीच्या वेळेपूर्वी (उदा. दुपारच्या सत्रात) पूर्वपरवानगीशिवाय गेल्यास अर्धा दिवस CL कपात होईल.
  • नियमबाह्य कपात: महिन्यात ३ वेळा लवकर गेल्यास (किंवा उशिरा येणे + लवकर जाणे असे केल्यास) १ दिवसाची CL कपात होईल.
  • अधिकृत काम (OOD/Training): शासकीय कामासाठी लवकर बाहेर पडताना शाळेच्या हालचाल नोंदवहीत (Movement Register) नोंद करून मुख्याध्यापकांची परवानगी घ्या व ॲपमध्ये 'On Duty' (OD) पर्याय निवडा.
  • वैयक्तिक आणीबाणी: तातडीच्या वैयक्तिक कामासाठी मुख्याध्यापकांच्या परवानगीने Half-day CL चा अर्ज सबमिट करूनच जावे.

ही पोस्ट शेअर करा...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top